जोडप्यानी दारू ढोसली, वियाग्रा खालली; शारीरिक संबंधावेळी इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

मनिपुर : शारीरिक संबंधावेळी काही कपल (Couple) खूपच उत्तेजित होतात. त्यात जर त्या कपलने ड्रिंक केली असेल आणि वियाग्रा घेतली असेल तर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारं एक प्रकरण समोर आलं आहे. कपल उत्साहात दारू प्यायलं, वियाग्रा घेतली आणि त्यानंतर त्यांना भयंकर परिणामाला सामोरं जावं लागलं

25 वर्षांची मिनल आणि तिचा बॉयफ्रेंड संतोष बिहारच्या जोधपुर शहरातील मनिपुर भागात राहणारं हे कपल. त्यांची तिसरी अॅनिव्हरसरी होती. त्यासाठी ते खूप उत्साहात होते. आपला हा दिवस अगदी छान पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. तशी तयारी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या कपलने शहरापासून दूर एका हॉटेलमध्ये रूम बुक केला. आपला हा दिवस अधिक खास करण्यासाठी दोघं आपल्यासोबत हॉटेलमध्ये बरंच काही घेऊन गेले होते. कपलने सांगितलं की ते तिथं दारू प्यायले. काही वेळातच त्यांनी दारूच्या तीन बाटल्या रिकाम्या केल्या. दोघंही इतके प्यायले होते की त्यांना खूप नशा चढली होती.

कपल दारूवर थांबलं नाही तर दारू प्यायल्यानंतर तरुणाने वियाग्रा घेतली. त्यानंतर त्याला इतका जोश चढला की तो आऊट ऑफ कंट्रोल झाला. त्याला इतका जोश चढला की शारीरिक संबंध ठेवताना त्याचा प्रायव्हेट पार्टच फ्रॅक्चर झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं.

प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी यूकेतील 40 वर्षीय व्यक्तीसोबतही असंच घडलं होतं. सेक्सदरम्यान या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. या व्यक्तीची ही केस ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही केस तशी दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही घटना गेल्या वर्षीची आहे.

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. याबाबत युरॉलॉजिस्टसनी (Urologist) सांगितलं की, 88 टक्के प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर केसेस या सेक्सदरम्यान होतात. प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्यास काही अन्य कारणंदेखील आहेत. त्यात अतिप्रमाणात हस्तमैथुन आणि झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा समावेश असतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *