डाॅक्टरनी पत्नीसह २ मुलांना सलाईनमधुन इंजेक्शन दिलं मग स्वत:ला संपवल ; दारावर सुसाईड नोट चिटकवली
येथील कर्जत तालुक्यात एका प्रसिद्ध डॉक्टरने कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन या गावात राहणारे डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आधी आपल्या पत्नी आणि दोन मुलांना सलाईनमधून इंजेक्शन देऊन मारले. त्यानंतर स्वतः गळफास घेतला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टर थोरात यांनी आपल्या राहत्या घरी भल्या पहाटे पत्नी आणि मुलांना मारून स्वतःचे आयुष्यदेखील संपवले. ज्या खोलीत त्यांनी गळफास घेतला त्याच्या दारावर एक नोट लिहिली होती. आत्महत्येपूर्वी कथितरित्या त्यांनीच ही नोट लिहिल्याचे सांगितले जात आहे.
त्यानुसार, “माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत.” महेंद्र जनार्धन थोरात (पती), वर्षाराणी महेंद्र थोरात (पत्नी), कृष्णा महेंद्र थोरात (मुलगा), कैवल्य महेंद थोरात(मुलगा), अशी मृतांची नावे आहेत.