ड्रायव्हरचं निघाला बायकोचा बाबु ; नवऱ्याने बाॅयफ्रेंडचा शेतात गळा चिरला, मग चक्क रक्त पितांना व्हि़डीओ बनवला
Crime News: कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे एका इसमाने एका व्यक्तीचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आरोपीला ही व्यक्ती आपल्या पत्नीचा प्रियकर आहे असे वाटत होते त्याच रागातून त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समजतेय. चिबल्लापुरा जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यात हा प्रकार घडला असून टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपीच्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
३२ वर्षीय विजय असे आरोपीचे नाव असून त्याला आता अटक करण्यात आली आहे.मंड्यामपेट येथील रहिवाशी विजयला गावातील एक सहकारी ‘मारेश’ आपल्या पत्नीशी जवळीक साधत असल्याचे कळल्यानंतर तो संतापला. मारेश आणि विजयची पत्नी सतत संपर्कात होते आणि ते त्यांच्या मोबाईल फोनवर नियमित चॅट करत असत, असे पोलिसांनी सांगितले. विजय मूळचा आंध्र प्रदेशचा असून सुमारे ३० वर्षांपूर्वी चिंतामणी येथे गेला.
त्यांचे कुटुंब खाद्यतेल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू विकायचे. विजयने काही वेळा त्याच्या मालाची ने-आण करण्यासाठी टाटा एस वाहन असलेल्या मारेशला कामावर ठेवले होते.विजयची पत्नी आणि मारेश यांच्यातील जवळीक लक्षात येताच त्याने मारेशला संपर्क न ठेवण्याची ताकीद दिली होती, त्याने ऐकण्यास नकार दिल्यावर मात्र विजय संतापला.
१९ जून रोजी विजयने त्याचा चुलत भाऊ जॉन बाबू याला सिद्धपल्ली क्रॉसवरून शेतापर्यंत माल नेण्यासाठी त्याच्या वाहनाची व्यवस्था करण्यासाठी मारेशला कॉल करण्यास सांगितले. मारेश त्याच्या वाहनाने आला आणि त्याला विजय आणि बाबू यांनी टोमॅटोच्या शेतात नेण्यास सांगितले पण गाडीतून विजय आणि बाबूने मारेशला एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्यावर हल्ला केला.
विजयने चाकूने मारेशचा गळा चिरला आणि नंतर त्याच्या मानेतून रक्त प्यायले, तर बाबूने हे कृत्य चित्रित केले. विजय घटनास्थळावरून निघून गेल्यावर हल्ल्यातून बचावलेल्या मारेशला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली. त्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाही मारेशने तक्रार देण्यास नकार दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. बाबूचा शोध व पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.