तब्बल २० वर्षानंतर घेतला आईच्या मृत्यूचा बदला; मुलाने आरोपीला घडवली जन्माची अद्दल

हरियाणाः आईच्या हत्येचा राग कित्येत वर्ष त्याच्या मनात धुसफुसत होता. २० वर्षानंतर त्याने आपल्या आईच्या मारेकरऱ्यांचा बदला घेतला आहे. चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना हरयाणात घडली आहे. २० वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला त्याने आता घेतला आहे. युवकाने ६५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

तरुण अडिच वर्षांचा असताना त्याच्या आईचा खून करण्यात आला होता. आईच्या हत्या प्रकरणात तीन जण सामील होते. यातील दोन जणांचा आधीच मृत्यू झाला होता. तर तिसरा व्यक्ती जिवंत असून तो सुरजीत असं त्याचं नाव होतं. रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावात शुक्रवारी रात्री ६५ वर्षीय सुरजीतच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक युवक रात्रीच्या वेळी मयत सुरजीतच्या घराकडे जाताना दिसत आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीला सुरुवात केली. फुटेजमध्ये सूरजीत यांच्या कुटुंबातील एक सदस्य सुनील असल्याचा संशय पोलिसांना आला. म्हणूनच त्यांनी चौकशीसाठी सुनीलला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशीचा फास आवळताच सुनीलने हत्येचा गुन्हा कबुल केला आहे. तसंच, हत्येचं कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत.

सुनीलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षांपूर्वी त्याचा आईचा खून तीन जणांनी मिळून केला होता. यात सुरजीतदेखील सहभागी होता. गावातील लोक यावरुन माझी थट्टा करत होते. माझ्या आईचे मारेकरी अजूनही जिवंत असून मोकाट फिरतातयेत आणि मी बदला घेऊ शकत नाही, असं येता जाता गावकरी माझी मस्करी करायचे.

आईच्या हत्येत सहभागी असलेल्या दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. फक्त सुरजीत जिवंत होता. रोज लोकांचे टोमणे ऐकून मी वैतागलो होते. म्हणून मी सुरजितच्या हत्येचा कट रचला. गायीच्या तबेल्यात झोपला असताना मी त्याच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून केला, असं कबुलीजबाब त्याने दिला आहे.दरम्यान, पोलिसांनी सुनीलला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले आहे. तसंच, गुन्ह्यात वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *