|

तरुण परदेशातून आला, घरी लग्नाची तयारी, पोलिस घरी आले अन् सगळे ढसाढसा रडायला लागले

गोपालगंज : परदेशात कामानिमित्त असलेला मुलगा घरी परतला,घरच्यांनी लग्नाची तयारी केली,पाहुणे जमले.सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या.लग्नाच्या आदल्या दिवशी गायब झालेला तरुण घरी परतला नाही.

त्याचा कुंटुबियांनी खुप शोध घेतला.ज्यावेळी पोलिस नवरदेवाच्या घरी आले त्यावेळी मंडपात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या जशी काय पायाखालची जमीन सरकली.हि घटना बिहार राज्यातील असुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असुन कुटुंबियांची कसून चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे.

संशय असल्यामुळे हत्या आणि आत्महत्या यांची चौकशी
लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाने रेल्वेच्या पटरीवरती मुलाचा मृतदेह सापडल्याने सगळ्यांना मोठा धक्काचं बसला आहे.हि घटना शुक्रवारी घडली.विशेष म्हणजे ज्या दिवशी पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला त्याचदिवशी त्याचं लग्न होणार होतं.

पोलिसांना संशय असल्यामुळे हत्या आणि आत्महत्या या दोघांचीही याची चौकशी करण्यात येणार आहे.मुलाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असुन परिसरातसुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नाच्या दिवशी मिळाला मृतदेह
सुंदर पट्टी गावातील निकेश कुमार याची बाॅडी सापडल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुंटुबियांच्या ताब्यात दिला आहे.युवकाच्या मृत्यूचं कारण शोधण्यात पोलिस व्यस्त आहे.मुलगा परदेशातुन लग्न करण्यासाठी आला होता.ज्या दिवशी त्याची बाॅडी सापडली,त्याच दिवशी त्याचं लग्न होणार होतं अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.

रात्रीपासुन तरुण गायब
कुंटुबियांनी सांगितल्यानुसार,निकेश कुमार रात्री घरातुन अचानक गायब झाला होता.त्यानंतर तो घरी आला नाही.शुक्रवारी कुटुंबियांनी त्याची खुप शोधाशोध केली.पण तरुणाचा काही पत्ता लागला नाही.त्यानंतर पोलिसांकडुन रेल्वेच्या ट्रकवर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *