तिकडं मुल देवीची आरती करत होते इकडं😥आईना गळ्याला फास लावुन सगळचं संपवल

मेहुणबारे (जळगाव) : स्वतःचे दीड एकर शेती असल्याने त्यातून कसाबसा प्रपंच करत होते. जोडधंदा म्हणून पतीने फायनान्स (Jalgaon) कंपनीकडून चारचाकी वाहनासाठी कर्ज घेतले. त्यातच बचत गटाचेही डोक्यावर कर्ज होते. हे कर्ज कसे फेडणार या विंवचनेत असलेल्या ३५ वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याला (Chalisgaon) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. या प्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

चाळीसगाव लातुक्यातील बहुर गावात शीतल पाटील ही महिला पती, दोन मुले व सासु-सासऱ्यांसह राहत होती. त्यांच्याजवळ दीड एकर शेती होती. त्यावरच घराचा प्रपंच सुरू होता. शेतीला जोडधंदा व्हावा, म्हणून महिलेच्या पतीने एका फासनान्स कंपनीकडून साडेचार लाखांचे कर्ज काढून मालवाहू वाहन घेतले.

त्यात बचत गटाचे देखील चार लाखांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडणार याची विवाहीतेला सतत चिंता लागलेली होती. मी सर्व कर्ज फेडून टाकेन, तु चिंता करू नको असा धिर देत पती नेहमी समजूत काढत होते.

पती समजावून गेले अन..
दरम्यान रविवारी (२२ ऑक्टोम्बर) सायंकाळपर्यंत विवाहीतेचे पती शेतात होते. तर मुले गावातच देवीच्या आरतीला गेलेले होते. तर विवाहीतेचे सासरे लहान दिराकडे तर सासू गावी गेलेली होती. पती घरी आले असता महिलेने कर्जाचे खूप टेन्शन होत असल्याचे पतीला सांगितले.

पतीने पत्नीची समजूत काढत देवीच्या आरती करण्यास निघून गेले. काही वेळाने दोन्ही मुले व पती घरी आले असता शीतल पाटील या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. आईची अवस्था पाहून देान्ही मुलांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी गावकऱ्यांची गर्दी झाली. महिलेला खाली उतरवून दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात विवाहीतेच्या पतीेने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *