तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला अन् त्यानंतर ‘ कल्पनेपलीकडचं ‘ घडलं

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या बिहारमधील मुजफ्फरपुर परिसरात समोर आलेले असून अनैतिक संबंधात होत असलेल्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने प्रियकराचा काटा काढलेला आहे . बिहारमधील मुजफ्फरपुर येथील ही घटना असून तिने तिच्या प्रियकराला घरी बोलावले आणि बेदम मारहाण केली त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यावर शेतात त्याचा मृतदेह तिने पुरून ठेवला आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात येत गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी मृतदेह उकरून काढून पुन्हा शवविच्छेदनासाठी पाठवून दिलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रमोद कुमार असे मयत प्रियकराचे नाव असून ही महिला आणि मयत युवक दोघेही विवाहित आहेत. आरोपी महिलेचा विवाह हा दहा वर्षांपूर्वीच झालेला असून तिला दोन मुले देखील आहेत. महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर असतो. प्रमोद कुमार याचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झालेला असून त्याच्या विवाहाच्या आधीपासून ही महिला आणि तो यांच्यात सुमारे चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते.

रात्री अकरा वाजता प्रमोद कुमार हा महिलेच्या घरी तिला भेटायला गेला त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि अखेर महिलेने त्याची हत्या केली. हत्या झाल्यानंतर महिला घाबरून गेली आणि पुरावा मिटवण्याच्या उद्देशाने तिने शेतात खड्डा करून त्याचा मृतदेह पुरला मात्र याच दरम्यान हा प्रकार एका व्यक्तीच्या लक्षात आला आणि पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली.

सदर व्यक्ती पोलिसात पोहोचला आहे याची महिलेला जाणीव झाली आणि त्यानंतर तिने स्वतःहून पोलीस ठाण्यात येत आपण प्रियकराची हत्या केलेली आहे याची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. आपला प्रियकर हा आपल्याला सातत्याने त्रास देत होता म्हणून आपण प्रमोद याचा खून केलेला आहे याची कबुली महिलेने दिलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *