तिच्या प्रेमामुळं जीव गमवावा लागला, जालन्यात समाधानसोबत प्रियसीसह आईना मिळुन भयंकर प्रकार केला
जालना: बलात्काराचा गुन्हा दाखल करेन,अशी धमकी देऊन मुलीकडुन सुरु असलेल्या छळामुळे जालन्यात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.यानंतर जालना पोलिसांनी वेगाने तपास करत सगळ्या घटनेचा छडा लावला आहे.त्यानंतर पोलिसांकडुन संबंधित व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित मुलगी व तिची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहराच्या दत्तनगर भागातील समाधान हरिभाऊ उकांडे(वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जालना शहरातीलच महावितरण कंपनीच्या कार्यालयात समाधान हरिभाऊ उकांडे ते कामाला होते.याठिकाणी एक मुलगी त्याच्यासोबतच काम करत होती.दिवसभर एकमेकांच्या संपर्कात आल्याने तिथेच त्यांचे सुत जुळले.समाधान हे विवाहित होते,तरीही त्यांनी या तरुणीच्या प्रेमात पडले होते.थोड्याच दिवसांमध्ये समाधान आणि या तरुणीच्या प्रेमसंबंधांची चर्चा आजुबाजूच्या लोकांमध्ये होऊ लागली.दोघांच्या घरच्यांनाही या प्रकरणाची कुणकुण लागली.यानंतर पुढे चक्रावणारा प्रसंग घडला.
समाधान याच्याशी अनैतिकसंबंध असलेल्या तरुणीने तिच्या आईच्या मदतीने समाधान याला त्रास देणे सुरू केले.सोबतच पैशांची मागणी देखील होऊ लागली.पैसे कमी पडु लागल्याने समाधान यांनी कर्ज काढुन पैसे उभे केले आणि त्यांना दिले.पण प्रियसी आणि तिच्या आईची पैशांची भुक भागेना.भरपुर पैसा मिळाल्यावर देखील त्यांनी समाधान यांना त्रास देणे सुरूच ठेवले.एवढेच नव्हे तर पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांच्याकडुन देण्यात आली.
याशिवाय मुलीच्या आईने माझ्या लेकीशी लग्न केले नाही तर,पेन ड्राइव्हमधील फोटो व्हायरल करून तुला बर्बाद करून टाकु अशी धमकीही समाधान यांना दिली होती.मुळात विवाहित असलेल्या समाधान याला हे शक्य नसल्याने तो हतबल होता.वारंवारच्या धमक्या,लग्नाची जबरदस्ती,पैशांची मागणी आणि पेनड्राईव्ह मधील फोटो व्हायरल करण्याच्या भीतीमुळे अखेर समाधान यांनी सिंदखेड राजा चौफुलीवरील कनकेश्वर मंदिर परिसरात गळफास घेऊन जीवन संपवल.
पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन चौकशी केली.तांत्रिक बाबी पडताळुन व घटनाक्रमाचे धागे दोरे जुळवत ती तरुणी पोलिसांच्या तपासात अडकलीच.याप्रकरणी मृताचा भाऊ संतोष उकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित तरुणी व तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.