‘ति पोरगी माझ्याशी न बोलता इतर पोरांशी बोलते’, बुलढाण्यात लेकाचा कृत्याने आई-वडिलं हादरले

बुलढाणा : आपली आवडती मुलगी आपल्याशी न बोलता इतर पोरांशी बोलत असल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नैराश्येतुन जीवन संपवल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे.महाविद्यालयातील एका वर्ग खोलीतच तरुणाने जीवन संपवल आहे.सुरज गावंडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सुरज बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता.महाविद्यालयात वर्ग खोलीत परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरु होते.यावेळी कर्मचाऱ्यांना सुरजचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.याप्रकरणी जळगाव जालोद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर काॅलेजमधील घटना
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर काॅलेजमध्ये ही घटना घडली.काल B.COM च्या अकाउंट या विषयाचा पेपर होता.पेपर सुरू होण्याआधीच सुरजने वर्ग खोलीत आत्महत्या केली आहे.

वर्गात परीक्षा क्रमांक टाकतांना घटना उघडकीस
B.COM च्या प्रथम सत्राची सध्या परीक्षा सुरू आहे.वर्ग खोलीत विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरू होते.यावेळी नंबर टाकतांनी कर्मचाऱ्यांना सुरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला.त्यामुळे संपूर्ण काॅलेजमध्ये खळबळ माजली आहे.

खिशात सापडली चिट्ठी
तात्काळ घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता खिशात एक सुसाईट नोट सापडली.

काय लिहलंय चिट्ठीत?
या चिट्ठीत ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर पोरांशी बोलत होती’अशा आशयाची माहिती लिहिलेली आहे.सोबतचं एका रजिस्टरमध्ये आणखी ३ मुलांची नावे देखील लिहिलेली असल्याने सुरजने एकतर्फी प्रेमातुन आत्महत्या केल्याचा अंदार वर्तविला जात आहे.याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *