‘ति’ मोठ्यांनी किंचाळत होती… नगरमध्ये सगळ्यांदेखत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, व्हिडीओ होतोय व्हायरलं

Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले होते. सुदैवाने तरुणी हल्ल्यातून वाचली आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Crime) अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बस स्थानकजवळ उभे असतानाच भरदिवसा तरुणीची आरोपीने छेड काढल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Ahmednagar Police) तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. राज्य महिला आयोगानेही (State Women Commission) या प्रकरणाची दखल घेतली आहे.अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बसस्थानकाजवळच आरोपीने दोन बहिणींची छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

छेडछाड होत असनाता स्थानिकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपीविरुद्ध कठोर करण्याची मागणी केली आहे.दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

“अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

हनुमान टाकळी येथील दोन अल्पवयीन बहिणी तिसगावच्या बसस्थानकावर उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी रफिकने मुलींची छेड काढून त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोन फोडला. भररस्त्यात हा सगळा प्रकार सुरु होता. तिथल्याच एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिसगावच्या नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊ तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *