‘तुझी बायको मला लई आवडती’,जालन्यात साडूला फोन, लहान मेव्हणीसोबत शिर्डीत शरीरसंबंध ठेवल्यानंतर…

जालना : शहराजवळील रोहणवाडी येथील ३० वर्षीय बलराम जयसिंग शिंगने याने नात्याला काळीमा फासला आहे. लहान मेहुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या जावयाला जालन्याच्या पिंक मोबाइल पथकाने अटक केली. त्याला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत म्हणजे २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील हनुमानघाट परिसरातील १९ वर्षीय तरुणीचे देऊळगावराजा तालुक्यातील एका तरुणासोबत लग्न झाले आहे. मात्र, लग्नानंतर त्या तरुणीच्या पतीला त्याच्या साडूने म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा बलराम शिंगने याने फोन केला. तुझी पत्नी मला खूप आवडते. तू तिला सोडून दे, असे सांगत धमक्या देवून शिवीगाळ केली. झाल्या घटनेमुळे नवरा बायकोत वाद होऊ लागले.

त्यामुळे पतीसोबत वाद झाल्यापासून ही १९ वर्षीय विवाहिता माहेरी जालना येथे हनुमानघाट येथे राहत आहे. त्यातच ३० डिसेंबर २०२२ ला मेहुणीला आधार कार्ड दुरुस्त करून देण्याचा बहाणा करत बलराम शिंगने हा रोहणवाडी येथे घेऊन गेला. त्यानंतर मेहुणा बलराम याने विवाहित मेहुणीवर रोहणवाडी येथे एका मित्राच्या घरी नेऊन शारीरिक अत्याचार केला. आणि हा प्रकार पुढे वाढतच गेला.

एवढ्यावरच न थांबता या वासनांध जावयाने हनुमानघाट येथील त्या तरुणीच्या माहेरी जाऊन तिथेही अनेकवेळा शारीरिक अत्याचार केले. यानंतर त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने नवनवे बहाणे करून आवडत्या मेहुणीला शिर्डी येथे घेवून जात तिथेही शारीरिक अत्याचार केले. याची वाच्यता केल्यास तुझी आई, भाऊ, बहिणीला ठार मारून टाकेल, अशा धमक्याही दिल्या.

तब्बल ४ महिने नराधम बलराम शिंगने याने विवाहित तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. अखेर याप्रकरणी परवा रविवारी जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात बलराम शिंगने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिंक मोबाइल पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी वासनांध बलराम याला अटक केली. त्याला बलराम याला काल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *