तुझ्या बायकोपेक्षा तर बरीचं बरी आहे! लिफ्टमध्ये मोठ भांडण, जोडपं संतापलं; बाई ऐकायला तैयारचं नाही

नोएडा: सोसायटीतील पाळीव कु्त्र्यांमुळे पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये आली. तेव्हा एका जोडप्यानं महिलेला कुत्र्याच्या गळ्यात असलेला मझल मास्क त्याच्या तोंडावर लावण्यास सांगितलं. महिलेनं स्पष्ट शब्दांत त्यांना नकार दिला आणि जोडप्यासोबत वाद घालू लागली.

नोएडाच्या सेक्टर १४२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेक्टर ३७ मध्ये लॉजिक्स सोसायटीत ही घटना घडली. सोसायटीत राहणारी गर्भवती तिच्या पतीसोबत लिफ्टजवळ गेली. लिफ्टचं दार उघडताच तिला एक महिला दिसली. तिच्यासोबत पाळीव कुत्रा होता. कुत्र्याच्या घरात मझल मास्क होता. मात्र कुत्र्याच्या मालकिणीनं तो कुत्र्याच्या तोंडावर लावला नव्हता.

कुत्रा कोणाला चावू नये म्हणून त्याच्या तोंडावर मास्क लावा, असं जोडप्यानं कुत्र्याच्या मालकिणीला सांगितलं. हे ऐकताच महिला संतापली. तिनं मझल मास्क लावण्यास नकार दिला. महिलेनं जोडप्यासोबत वाद घेतला. ‘तुमच्या सारख्या माणसांनाच कुत्रे चावतात,’ असं महिला म्हणाली. त्यावर नोएडामध्ये कुत्रा चावण्याच्या घटना वाढत आहेत आणि ही कुत्र्याला मझल मस्क लावण्यास तयार नाही. कशी महिला आहे ही, असं जोडप्यातील पुरुषानं म्हटलं. त्यावर कुत्र्याच्या मालकिणीनं तुझ्या पत्नीपेक्षा तरी चांगलीच आहे, असं उत्तर महिलेनं दिलं.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर कोणीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस म्हणाले. कुत्र्याच्या मालकिणीनंतर एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘लिफ्टच्या समोर आलेल्या जोडप्यानं मला शिव्या दिल्या. अपशब्द वापरले. त्यावरुन आमचा वाद झाला,’ असं तिनं म्हटलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *