‘तु त्यांच्यासोबत झोप,मी त्यांना ४-५ हजार रुपये द्यायला सांगतो’,पुण्यात मैत्रिणीला ऑफर अन्…

पुणे : मैत्रिणीला घरी बोलावून दोघांना तू आवडतेस, त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेव, अशी नको ती ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीची मैत्रीण तृणाल (रा. खेड शिवापूर) आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ मार्च रोजी रात्री घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने बालाजीनगर येथील घरी बोलावले. तेथे तिने दोघांची ओळख करून दिली. फिर्यादी या गप्पा मारत असताना सुवर्णा या मैत्रिणीने तू त्या दोघांना खूप आवडतेस, तू त्यांच्यासोबत झोप. मी त्यांना ४ ते ५ हजार रुपये देण्यास सांगते, असे म्हणाली. त्याला फिर्यादीने नकार दिला.

तेव्हा आरोपीने फिर्यादीबरोबर भांडण करून पैसे चोरल्याचा आळ घेतला. फिर्यादी या रूमच्या बाहेर येत असताना सुवर्णा व तृणाल यांनी फिर्यादीला पकडून ठेवले. तृणाल व त्याच्या मित्राने फिर्यादीबरोबर अश्लिल वर्तन केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिस हवालदार जोशी तपास करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *