‘तेरे बिन नही जीना…,’पंढपुरच्या इंजिनीअर निखिलना मृत्यूला कवटाळलं; प्रेमपत्रामुळे एकचं खळबळ

संभाजीनगर : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली असून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निखिल दत्तात्रय चौडांळे ( रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिल मूळचा पंढरपूर इथला असून तो इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगरमध्ये राहत होता.

दरम्यान, आज सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आले. याबाबत माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच निखिलचे नातेवाईक पंढरपूर येथून पैठणकडे रवाना झाले आहेत.

खोलीत आढळले प्रेमपत्र….
निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्र आढळून आली आहेत. तर एका प्रेमपत्रात ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर या युवकाने आत्महत्या का केली ? कुठल्या युवतीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते का ? या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *