तो २८ वर्षापासुन भीक मागायचा, पोलिसांनी चौकशी करताचं अमरावती हादरलं; भिकार्याला जेलची हवा

अमरावती : बायकोची हत्या करून आरोपी 28 वर्षांपुर्वी फरार झाला.आपण आता पोलीस अटकेपासुन वाचलो असे समजत असताना पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केलीय.फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याची मोहिम सध्या अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली आहे.या मोहिमेत अमरावती ग्रामीणच्या ब्राह्मणवाडातील ठाणेदार पंकज दाभाडे यांनी आरोपी नुरुल्ला खान वजीरउल्ला खान याला तब्बल 28 वर्षांनंतर धरलयं.

ब्राह्मणवाडा थडी येथील आरोपी नुरुल्ला खान याने बायकोची हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला होता.तो अमरावती येथे भीक मागुन जीवन जगायचा.तो ट्रान्सपोर्ट नगर येथे राहत असल्याची गुप्त माहिती दाभाडे यांना मिळाली.त्यांनी पथक पाठवुन आरोपीला अटक केल्यावर त्यानी गुन्हा कबुल केला.

अटकेपासुन बचावासाठी मागत होता भीक
अमरावती येथे नुकत्याच झालेल्या इजतेमांमध्ये नुरूल्ला खान भीक मागताना आढल्याची गोपनीय माहिती मिळाली.पोलिसांनी शोध घेऊन रस्त्याच्या कडेला झोपेत असलेल्या नुरुला खान याला तब्बल 28 वर्षानंतर अटक केलं आहे.

हा आरोपी अटकेपासुन वाचण्यासाठी भीक मागत होता.एका चुकीमुळे आयुष्याची २८ वर्षे त्याने भीक मागुन दिवस काढले.अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडलाचं.गुन्हा केल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. शेवटी जेलची हवा खावी लागणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *