‘दादागिरी करत भाऊ बायकोसोबत अफेअरची सतत मागणी करायचा’, नाशिकमध्ये भावजईवर डोळा, संध्याकाळी…

नाशिक : सततचा कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधाच्या वादातून लहान भावाने चुलत भावाच्या मदतीने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला. इतकंच नाही तर मृतदेह शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावात घडली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी लहान भाऊ आणि त्याला मदत करणाऱ्या चुलत भावाला अटक केली आहे.

रफिक शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, आरोपी लहान भाऊ तौफिक शेख आणि आरोपी चुलत भाऊ सलमान शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत.

माणिकपुंज गावाजवळ रस्त्यालगत मंगळवारी 27 वर्षीय रफिक शेख या तरुणाचा मृतदेह आढळला होता. याबाबत रफिकच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. रफिक हा मका पिकाला पाणी देण्यासाठी सोमवारी संध्याकाळी गेला होता, तो सकाळपर्यंत घरीच परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर गावातील रस्त्यालगत मृतदेह आढळला.

याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता रफिकचा लहान भाऊ तौफिक आणि चुलत भाऊ सलमानच्या हालचाली संशायास्पद वाटू लागल्या. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तौफिकने गुन्ह्याची कबुली दिली.मोठा भाऊ रफिक हा दादागिरी करत लहान भाऊ तौफिकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाची मागणी करत असल्याची माहिती तौफिकने दिली. त्या रागातूनच ही हत्या केल्याचं तौफिकने सांगितलं.

भावाचा काटा काढण्याचा कट 8 दिवसापूर्वी रचला. 23 जुलै रोजी तौफिक आणि सलमानने वीज पंप चालू होत नसल्याचे सांगून, रफिकला शेतात बोलावून घेतले. तू माझ्या बायकोला का त्रास देतो, अशी विचारणा तौफिकने रफिकला केली. दोघांमध्ये वादावादी होऊन झटापट झाली.या वादात तौफिक आणि सलमानने रफिकच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून शेतातच लपवून ठेवला. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास मृतदेह गावाच्या रस्त्यालगत फेकून दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *