दाद्या…दिवाळीला मला साडी कोण घेणार रे आता, मयुरची बाॅडी अन् बहिणीना फोडला हंबरडा

Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून ८ किमी अंतरावर असलेल्या शेंदूर्जन गावातील दोन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयूर बाजीराव इंगळे (वय १९ वर्ष) आणि विठ्ठल शिंगणे (वय ५५ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. (Breaking Marathi News)

एकाच दिवशी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरात (Buldhana News) मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मयुर बाजीराव इंगळे या १९ वर्षीय तरुणाने गावानजीक असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. (Latest Marathi News) मयुर याच्या मागे आई, १ बहीण आणि १ भाऊ असा परिवार आहे. दुसरीकडे विठ्ठल शिंगणे या शेतकऱ्याने टीनाच्या अँगलला शेतीकामातील दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं (Crime News) कारणही समजू शकलेलं नाही. शिंगणे यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, एकाच दिवशी गावातील दोन जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने शेंदूर्जन गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रामदास वैराळ करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *