दारुच्या नशेत पोलिस कर्मचार्यानी हवालदाराच्या पार्श्वभागात टाकलं पेट्रोल अन् पुढं…

राजस्थानातील जयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही मद्यधुंद पोलिसांनी आपल्याच पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद पोलिसांच्या या धक्कादायक कृत्यानंतर बेशुद्ध झालेल्या संबंधित कॉन्स्टेबलला घाई गडबडीत येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या कॉन्स्टेबलची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा प्रकार पोलीस आयुक्तालयाच्या पहिल्या क्रमांकाच्या पोलीस ठाण्याचा पुरस्कार मिळविणाय शिप्रपथ पोलीस ठाण्याशी संबंधित आहे.येथे दारूच्या नशेत काँस्टेबल सवाई, रोशन आणि छोटू होळी खेळत होते. याच वेळी त्यांनी 50 वर्षीय चेतक ड्रायव्हर कॉन्स्टेबल किशन सिंह यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलची संपूर्ण बाटली ओतली. या धक्कादायक कृत्यानंतर पीडित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण आपबीती सांगत न्याय मागितला आहे.

कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर लिहिला मेसेज –
पीडित कॉन्स्टेबलने आपल्या पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली आहे. यात, आपल्या पोलिस ठाण्यात पेट्रोलने होळी खेळणारे लोक आहेत. माझ्यासोबत झालेले कृत्य अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येते. माझे वय 50 वर्षे आहे. माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकले गेले. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला आहे, असे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने म्हटले आहे.

अधिकाऱ्यांवर प्रकरणावर पडदा टाकण्याचा आरोप
या घटनेनंतर, शिप्रा पथ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेनसून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *