दिड वर्षाच्या चिमुरड्याला वाचविण्यासाठी आई-बाप शेवटपर्यंत लढले पण शेवटी…पुण्यात बाप-लेकाचा करुण अंत

पुणे : येथील शिरुर तालुक्यातील जांबुतमध्ये वडील आणि मुलाचा स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करुण अंत झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सत्यवान शिवाजी गाजरे (28) राजवंश शिवाजी गाजरे (दिड वर्ष) असे मृत वडील आणि मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत मदत मिळाल्याने स्नेहल सत्यवान गाजरे (25) यांचा जीव वाचला आहे. (Father and son die tragically after drowning in swimming tank in Pune)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बेल्हे जेजुरी महामार्गावर जांबुत (पंचतळे) येथे शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे ‘चारंगबाबा हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्र’ आहे. रविवारी (30 मे) सांयकाळी 4 च्या सुमारास शिवाजी गाजरे यांचा मुलगा सत्यवान, सुन स्नेहल आणि नातु राजवंश हे हॉटेल परिसरात आले होते.

यावेळी सून आणि मुलगा कामात असताना राजवंश खेळताना हॉटेल परिसरातील स्विमिंग टँकमध्ये जाऊन पडला. यावेळी राजवंशला वाचविण्यासाठी सत्यवान टँककडे धावला. मात्र त्यालाही पोहता येत नसल्याने तोही बुडू लागला. पती आणि मुलगा बुडत असल्याचे पाहुन घाबरलेल्या स्नेहलनेही पाण्यात उडी मारली. मात्र तिलाही पोहता येत नसल्याने ती सुद्धा पाण्यात बुडू लागली.

त्यावेळी सत्यवानचा भाऊ किरण आरडा-ओरडा ऐकु आल्याने टँककडे धावत गेला. यावेळी किरण यांना स्नेहलला वाचविण्यात यश आले. मात्र भाऊ आणि भावाच्या मुलाला वाचवण्यात यश आले नाही. सत्यवान आणि राजवंशला त्यांनी वर काढून तात्काळ जांबुत येथे खाजगी दवाखाण्यात नेले. त्यानंतर आळे येथे नेले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यु झाला होता. त्यांच्यावर रविवारी रात्री उशीरा जांबुत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *