दु:खद! शेजाऱ्यांसाठी इफ्तारचं जेवणं केलं, शिक्षिकेसह पतीचा झोपेतच करुण अंत; एका रात्रीना सगळं संपवल
दुबई: भारतीय जोडप्याचा दुबईतील अपार्टमेंटला लागलेल्या आगीत होरपळून करुण अंत झाला आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत इफ्तारचं जेवण तयार करताना ही दुर्घटना घडली. राजेश कलंगदन (३८) आणि जेशी कलंगदन (३२) अशी दोघांची नावं आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इमाम कासिम (४३) आणि एस मोहम्मद रफीक यांचादेखील मृतांमध्ये समावेश आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
रितेश एका ट्रॅव्हल कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करायचे, तर जेशी या शाळेत शिक्षिका होत्या. १५ एप्रिलला त्यांच्या अपार्टमेंटला आग लागली. दुर्घटना घडली तेव्हा दोघे झोपले होते. श्वास गुदमरल्यानं त्यांचा मृत्यू झाला. दुबईजवळच्या दायरा येथील अल मुरार परिसरात असलेल्या इमारतीला दुपारच्या सुमारास आग लागली. साडे बाराच्या सुमारास याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली, असं खलीज टाईम्सनं वृत्तात म्हटलं आहे.
एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आगीचे आणि धुराचे लोट दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या इमारतीत अनेक परदेशी नागरिक वास्तव्यास होते. मृतांमध्ये चार भारतीय, तीन पाकिस्तानी नागरिकांसह कॅमेरुन, इजिप्त, जॉर्डनच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह मायदेशी पाठवण्याची तयारी सुरू आहे.
रिजेश आणि मी केरळमधील एकाच गावचे आहोत. रिजेश साधारणत: १० वर्षांपूर्वी यूएईला आला. त्याच्याआधी मी इथे आलो, अशा शब्दांत रिजेश यांचे मित्र मन्सूर अली यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. रिजेशच्या इमारतीमध्ये आग लागल्याचं समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. रिजेश आणि त्याची पत्नी रुग्णालयात असतील, त्यांच्यावर उपचार सुरू असतील, अशी भाबडी आशा होती. मात्र दोघेही रुग्णालयात नव्हते. त्यांचे मृतदेह शवागारात दिसले आणि मला धक्काच बसला, असं अली यांनी सांगितलं.