दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी

जयपुर: राजस्थानच्या जोधपुरपासून 90km दुर ट्रेलर आणि कारचा भीषण अपघात झाला.त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला.चालक राजुरामच्या मृत्यूनंतर १२ तासांनी त्यांच्या पत्नीनं रुग्णालयात मुलाला जन्म दिला.राजुराम यांची बायको त्यांची वाट पाहत होती.मात्र ते परतलेचं नाहीत.बाळाच्या जन्मानंतर बराच वेळानंतर त्यांना पतीच्या मृत्यूबाबत सांगण्यात आलं.

राजुरामच्या मृत्यूमुळे पत्नी शिपुदेवींची अवस्था बिकट झाली आहे.हाॅस्पिटलमध्ये बाळाला कुशीत घेऊन त्या पतीची आतुरतेने वाट पाहत होत्या.मात्र पती भेटायला आलाच नाही.मुल जन्माला आल्यानंतर अवघ्या १२ तासांत त्याचं पितृछत्र हरपलं.शिपुदेवींचं सौभाग्य काळानं हिरावलं.शिपूदेवी यांना ३ मुली आहेत.त्यांना १ मुलगा हवा होता.सुदैवानं त्यांची हि इच्छा पूर्ण झाली.मात्र मुलाचा चेहरा पाहायला त्याचे वडीलांनी जग सोडले.मुलाचा शेवटचा चेहराही त्यांना पाहता आला नाही.

राजु आणि शिपू यांचा विवाह १३ वर्षांपूर्वी झाला.त्यांना ३ मुली आहेत.सर्वात मोठी लेक दिलजानी ११ वर्षांची आहे.८ वर्षांची डिंपल आणि १.५ वर्षांची रिना यांच्यामुळे कुटुंब पंचकोनी झालं.तिघा बहिणींना आता एक भाऊ मिळाला.मात्र त्यांचे बाबा आता या जगात नाहीत.दिलजानीनं वडिलांच्या प्रेताला मुखाग्नि दिला.राजु त्यांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

ड्रायव्हर म्हणुन काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.राजु यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.राजु यांच्या आईनं नातवाचं चेहरा पाहिला.मात्र त्याआधी त्यांनी त्यांचा मुलानी प्राण सोडले.राजु यांच्या निधनामुळे सर्वत्र शोकांतिका पसरली आहे.

जोधपुरपासून 90km अंतरावर हा मोठा अपघात झाला.त्यात हेड कॉन्स्टेबल तेमीराम(३५) आणि कॉन्स्टेबल मोहनलाल यादव यांचा मृत्यू झाला.शनिवारी संध्याकाळी ते गुन्हेगाराला पकडण्यासाठी नागोरला चालले होते.त्यांची कार राजुराम देविसी(३८) चालवत होते.आसोपहुन १.५ किलोमीटर पुढे गेल्यानंतर कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरनं धडक दिली.त्यात या तिघांनाही आपला जीव गमवावा लागला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *