दुसरा पती इतकी खालची पातळी गाठेल ‘असं‘ वाटलं नव्हत, नागपुरात बायको बाथरुममध्ये अंघोळ करतांना…
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या नागपूर इथे समोर आलेले असून मोबाईलमध्ये स्वतःच्याच बायकोचा आंघोळ करताना व्हिडिओ काढण्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. सदर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित पतीने दहा लाख रुपये होण्यासाठी या पत्नीचा छळ सुरू केल्याचा आरोप पीडित महिलेने केलेला असून सासरच्या व्यक्तींनी आपले दागिने देखील हडपलेले आहेत असे देखील विवाहित महिलेचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलेचे वय 35 वर्ष असून तिने दिलेल्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसात पती आणि तिच्या सासू-सासर्यांच्या विरोधात हुंडा मिळवण्यासाठी छळ केल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. पीडित महिलेचा पती आणि सासू-सासरे हे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
2008 साली पीडित महिलेचे एका युवकासोबत लग्न झाले होते त्यानंतर तिला दोन जुळे मुले देखील झाली मात्र मुले झाल्यानंतर सातत्याने वाद सुरू झाले म्हणून महिलेने अखेर पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि वडिलांकडे राहायला गेली त्यानंतर लग्नविषयक एका वेबसाईटवर तिची खाजगी व्यावसायिकासोबत ओळख झालेली होती त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये तिने या व्यवसायिकासोबत लग्न केले.
लग्नानंतर तिच्या दोन्ही मुलांना तिने वडिलांकडेच ठेवलेले होते. लग्नात महिलेच्या वडिलांनी चार लाखांचे दागिने दिले त्यानंतर काही दिवसात ही महिला गर्भवती राहिली.महिला गर्भवती राहिल्याचे समजताच तिचा दुसरा पती आणि त्याचे नातेवाईक यांनी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी तिचा छळ सुरू केला. तिला मारहाण देखील करण्यात आली त्यामुळे तिचा गर्भपातही झाला.
महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली यावेळी देखील तिचा गर्भपात झाला त्यावरून तिला सासरी त्रास होत असल्याने ती कंटाळून माहेरी निघून आली होती.काही दिवस माहेरी राहिल्यानंतर तिने पतीसोबत दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये राहण्यास सुरू केले त्यावेळी पतीने पुन्हा दहा लाख रुपयांसाठी तिची छळवणूक सुरू केली.
आरोपी पतीने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला आणि पैसे दिले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेचे दागिने देखील सासू-सासर्यांनी हडप केले ते तिने परत मागितले तर तिला दमदाटी करण्यात आली अखेर तिने मानकापूर पोलिसात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.