देव चांगल्या लोकांसोबत इतका क्रूर का वागतो? ८ महिन्याच्या गरोदर😥डाॅक्टरचा घरातचं मृत्यू
मुंबई: अभिनेत्री रेंजुषा मेननच्या निधनाच्या धक्क्यातून मल्याळम इंडस्ट्री सावरत असतानाच आणखी एका अभिनेत्रीच्या धक्कादायक मृत्यूची बातमी आली आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्री आणखी एका मृत्यूच्या बातमीने हादरुन गेली आहे. करुथामुथू या मालिकेत दिसलेली ३५ वर्षीय अभिनेत्री डॉ प्रियाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाने अवघी मल्याळम टीव्ही इंडस्ट्री हळहळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती ८ महिन्यांची गरोदर होती. ३१ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने डॉ. प्रियाचे निधन झाले.
अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट करत अभिनेता किशोर सत्याने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अभिनेत्याने असे लिहिले की, ‘मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एक अनपेक्षित मृत्यू, डॉ प्रियाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती आठ महिन्यांची गरोदर होती.
नवजात बालक आयसीयूमध्ये आहे. तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती, ती नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. एकुलत्या एक मुलीच्या निधनाने तिची आई हादरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिची काळजी घेणार्या तिच्या नवऱ्याच्या वेदना शब्दात मांडता येणार नाहीत.’
त्याने पुढे म्हटले की, ‘काल रात्री हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांचे सांत्वन कसे करावे हेच कळत नव्हते. देव अशा चांगल्या लोकांसोबत इतका क्रूर का वागतो? रंजूषाचे निधन स्वीकारण्याआधीच आणखी एक मृत्यू. जेव्हा ३५ वर्षांची व्यक्ती जग सोडून जाते, तेव्हा शोक शब्दही चुकीचा वाटतो. प्रियाचे आई-वडील आणि तिचा नवरा यावर कसा मात करतील… त्यांना हिम्मत मिळो,’ अशी भावनिक पोस्ट किशोरने शेअर केली आहे.
डॉ प्रिया ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होती. करुथमुथु या लोकप्रिय मालिकेत तिने किशोरसोबत स्क्रीन शेअर केली होती. अलीकडेच तिने लग्नानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. प्रिया व्यवसायाने डॉक्टर होती. दरम्यान या घटनेच्या एक दिवस आधी मल्याळम अभिनेत्री रेंजूषा मेननचे निधन झाले होते. तिच्या राहत्या घरात ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती.