‘दोन्ही बहिणींना माझं तोंडही दाखवू नका’, भावानी चिठ्ठीत सगळ लिहुन गळ्याला फास लावला

भोपाळ : जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका.

माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात हा प्रकार घडला.

धाकट्या भावाने सर्वप्रथम मृतदेह पाहिला
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संयोगितागंज पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव गोपाल वर्मा आहे. तो जिम ट्रेनर होता. गोपालला नितेश आणि अंकुश असे दोन भाऊ आहेत. घटनेच्या वेळी त्याचे आई -वडीलही घरात होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याचा भाऊ नितेशने फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

चुलत बहिणींशी वाद
जिम प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोपाळचे काम काही महिन्यांपासून बरे चालले नव्हते. तसेच गेल्या काही काळापासून त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत मालमत्तेवरुन वाद सुरु होते. त्याच्या काकांना दोन मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणीही मध्ये पडत होत्या. यामुळे तो चुलत बहिणींवरही काही दिवस रागावला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?
“मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. माझी शेवटची इच्छा हीच आहे की माझ्या दोन्ही बहिणी गोलू आणि मुन्नू यांना माझा चेहराही दाखवू नका. माझी त्या दोघींवर कोणतीही नाराजी नाही. मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. प्रिती सिलावटलाही माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही.” असं गोपालने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *