|

धक्कादायक! पुण्यात ऑफिसमध्ये महिलेला आधी पाठीमागून मिठी मारली नंतर तिला…

पुणे- पुण्यात अनेक व्यक्ती रोजगाराच्या शोधात देखील येतात आणि त्यानंतर काम मिळाल्यावर देखील काही विकृत व्यक्तींकडून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.गेल्या काही महिन्यांपासुन पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला असुन अशीच एक घटना पिंपरी परिसरात समोर आलेली आहे.

पिंपरी परिसरातील एका कार्यालयात एकट्या असलेल्या महिलेला अचानकपणे मिठी मारून तिचा विनयभंग केला.सोबतचं माझ्यासोबत जर रिलेशन ठेवले नाही तर तुझ्यावर ऍसिड फेकुन देईल अशी देखील धमकी या व्यक्तीने तिला दिली.चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन किशोर मानिकराव साने(वय ३२) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

ऑक्टोबर 2022 पासुन आरोपी या महिलेला सतत त्रास देत होता.महिलेनी यांनी त्याला विरोध केला त्यावेळी त्याने, ‘जर कोणाला काही सांगितले तर तु कंपनीत फ्रॉड केलेला आहे अशी तुझ्यावर केस लावील आणि तुला गुन्ह्यात अडकवेल.मला तु तशीही आवडतेस म्हणुन माझ्यासोबत जर संबंध ठेवले नाही तर मात्र तोंडावर मी ऍसिड फेकेल ‘,अशी देखील आरोपीने धमकी दिली असे तरुणीने म्हटले आहे.सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *