धक्कादायक! सकाळी वडिल लग्न झालेल्या लेकीला भेटायला गेले; सायंकाळी मृतदेह घेऊन आले

उन्नाव जिल्ह्यातील सिव्हील लाइन मोहल्ला येथे राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे.मृत मुलीच्या कुंटुबियांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला आहे.मृताच्या कुंटुबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.तपासात जे काही तथ्य समोर येईल,त्यानुसार पुढचे पाऊल उचलले जाईल,असे पोलिसांनी सांगितले.

कोतवाली परिसरातील रामदिई खेडा येथील रहिवासी असलेल्या मुलीचे वडील उदयभान अवस्थी यांनी सांगितले की,शुक्रवारी सकाळी १२ वाजता आम्ही मुलीला घेण्यासाठी आलो होतो.पण तिच्या सासरच्या मंडळीनी पाठवले नाही.त्यानंतर दुपारी ५ वाजता फोन केला की,तुमच्या मुलीने विष घेतले आहे.आम्ही परत गेलो तर दरवाजा बंद होता.मग कसे तरी दार तोडुन आम्ही मुलीला घेऊन हाॅस्पिटलमध्ये नेले.

सासरच्या मंडळींनी मुलीला उपचारासाठीही नेले नाही,असा आरोप वडिलांनी केला आरोप आहे.बेशुद्ध अवस्थेत वडिलांनी तिला कबाखेडा येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये नेले,तेथे उपचारादरम्यान तिने प्राण सोडले.लेकीच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.रडुन त्यांची अवस्था वाईट झाली आहे.दूसरीकडे सदर कोतवाली पोलिसांना महिलेचा विषाने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले.पोलिसांनी कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली आणि बाॅडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवली.

मुलीला मोलकरीसारखी वागणुक
मृत मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की,जावई आणि सासु-सासरे आपल्या मुलीला मोलकरीण म्हणुन ठेवत असत.तिला त्याच्या माहेरलासुध्दा जाण्याची सुट नव्हती.एकदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.थोडेफार दिवस सर्व काही ठीक होते,त्यानंतर तिला विष देऊन संपवण्यात आले.त्यांच्या सुनेने विष पाजले होते.मृत्यूच्या १ दिवस आधी मुलीला मारहाणदेखील करण्यात आली होती,असा आरोपही कुटुंबियांकडुन करण्यात आला आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *