धाराशिवच्या मुलाने सोलापुरच्या मुलीसोबत दिवसभर शारिरीक संबंध ठेवले अन् पुन्हा रात्री तिला घरी सोडताचं धक्का बसला
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात समोर आलेले असून लग्नाचे आमिष दाखवून मोटरसायकलवर घेऊन जात एका 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात लग्नाचा विचार बदलत तरुणाने तिला पुन्हा आणून सोडले. संतप्त झालेल्या फिर्यादी तरुणीने पांगरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिलेल्या असून 31 मार्च ते एक एप्रिल 2023 दरम्यान हा प्रकार घडलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अमित रमाकांत माळी ( वय 23 राहणार काळी जिल्हा धाराशिव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. 31 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी ही घराच्या अंगणात बसलेली होती त्यावेळी आरोपीने तिला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणून मोटार सायकलवर तीला बसवत पलायन केलेले होते त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला.
एक तारखेपर्यंत त्याने तिला तिच्यासोबतच ठेवले आणि त्यानंतर सोलापूरमार्गे तुळजापूरला येत असताना वाटेत गाडी थांबून पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास गावात आणून सोडले. पीडित मुलीने त्याला लग्नाबद्दल विचारल्यानंतर ‘ तुझी लायकी आहे का माझ्याशी लग्न करण्याची ? ‘ असे म्हणत तिला शिवीगाळ केली त्यानंतर पीडित तरुणीने त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे.