धाराशिवमध्ये बायकोचं बाहेर प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय, वेळोवेळी नजर ठेवायचा अन् काल पत्नीला जबर धक्काचं दिला

धाराशिव : माणसाच्या डोक्यात संशय घुसला की तो कुठल्याही स्तराला जातो. धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीनं पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकाचा खून केला आहे. धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी येथे एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. पत्नी बरोबर अनैतिक संबध आहेत या संशयावरुन २२ वर्षीय सुधाकरचा खून करण्यात आला. गणेश सोनटक्के असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

गणेश सोनटक्के याला मृत सुधाकर चौरे याचे पत्नी बरोबर अनैतिक संबध असल्याचा संशय होता. संशयामुळं त्यानं सुधाकरचा खून करुन केला. सुधाकर चौरे याच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गणेश सोनटक्के याला अटक केली आहे.

टाकळी येथील सुधाकर शहाजी चौरे वय २२ वर्ष हा शेजारच्या विष्णु खमरु कमलपुरे यांच्या शेतात दुपारी खोंड बघायला गेला तो परत आलाच नाही.आली ती सुधाकरचा खून झाल्याची बातमी. सुधाकर खोंड बघुन घराकडे येत असताना गणेश युवराज सोनटक्के वय ३२ वर्ष रा. टाकळी (बेंबळी.) ता.जि धाराशिव याने वाटेत आडवले.

गणेश सोनटक्के यानं सुधाकर चौरे याचा कोयत्याने काकासाहेब पाटील यांच्या उसाच्या शेताजवळ काटा काढला. विशेष म्हणजे घटनास्थळापासून ३० फुटाच्या अंतरावर काही महिला ज्वारीच्या शेतात काम करत होत्या. पण त्यांना या घटनेचा सुगावा लागला नाही.

सुधाकर चौरे याचे वडील शहाजी वसंत चौरे वय ४८ वर्ष रा. टाकळी (बें) ता. जि. धाराशिव यांच्या फिर्यादीवरुन गणेश युवराज सोनटक्के वय ३२ वर्ष रा. टाकळी (बेंबळी ) ता.जि धाराशिव यांच्या विरुध्द बेंबळी पोलीस स्टेशनला कलम ३०२,५०६ भारतीय दंड विधान संहिते नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी गणेश युवराज सोनटक्के याला अटक झाली असुन आरोपी गणेश सोनटक्के जख्मी असल्यामुळे शासकीय रुग्णालय धाराशिव येथे दाखल करण्यात आलं आहे. सहायक पोलीस निरिक्षक योगेश शिंदे हे या प्रकरणी तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *