नगरमध्ये एकाच चितेवर तिन्हीं भावडांवर अंत्यसंस्कार, कुंटुबियांचा काळीज पिळवटुन टाकणारा आक्रोश

अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील खर्डा येथे तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणाऱ्याा या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि मुलीचा समावेश आहे.

तीन भावंडांवर काळाचा घाला…
याबाबत अधिक माहिती अशी की, खर्डा (Ahmednagar) येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

तिघांचा बुडून मृत्यू….
दहावीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे), दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) अशी या मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दिपक हे सख्खे भाऊ- बहिण आहेत.

बहिणीला वाचवायला भाऊ धावले अन् विपरित घडलं…
सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे पाण्यात उतरली.

आईचा जीव वाचला..
मात्र तिही बुडत असताना आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे सरपंच बिबिषन वाघमोडे, चांद पठाण, भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांच्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश काळीज चिरडुन टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *