नगरमध्ये पत्नीसमोरचं पतीला लावला साडीने गळफास, तडफडुन शेवट ;धक्कादायक माहिती समोर

कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला देखील जखमी केले होते, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र आता या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पत्नीनेच पतीची हत्या करत बनाव रचल्याचे पोलीस (Shrirampur Police) तपासात समोर आलं आहे.

एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली होती. दरोडेखोरांनी पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला होता. दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे बुशराने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांनी घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात अशी माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

नईम पठाण यांस पत्नीने बुशरानेच संपवल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे. पती नईमची हत्या केल्यानंतर बुशराने दरोड्याचा बनाव केला होता. बुशराने नईमला झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर त्याचा साडीने गळा आवळल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.

पोलिसांनी नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकरणानंतर अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

एकलहरे- बेलापूर रस्त्यालगत नईम पठाण यांची शेतवस्ती आहे. नईम हे पत्नी बुशरा व दोन मुलांसह घरी होते. बुधवारी मध्यरात्री रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात गेल्या तेव्हा बाहेर दबा धरून बसलेले चार पुरुष व एका महिलेने नईमच्या त्यांना फरफटत घरात आणले आणि जबर मारहाण केली. आरडाओरडा होताच नईम यांना दरोडेखोर घरात आल्याचे दिसले. मात्र काही कळायच्या आत दरोडेखोरांनी त्यांचा गळा आवळला, अशी माहिती बुशराने तिच्या वडिलांना सांगितली होती. बुशराचे वडील अन्वर चिराग शेख यांनी घरी पोहोचून पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला होता. पोलिसांनी सखोल तपास केला असता बुशराने पतीची हत्या केल्याचे समोर आलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *