नगरमध्ये विवाहित नेहा रात्री अंधारात उभी राहुन बोलत होती😥अन् काही कळण्याच्या आत प्राण सोडले
अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत आरोपीलाही ताब्यात घेतलंय. पोलीस या प्रकरणी आधिक तपास करतायत. (‘साम टीव्ही’चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी रात्रीच्या सुमारास अंधारात उभी राहून एका तरुणासोबत बोलत होती. तिच्या ककांनी हे पाहिलं. पुतणीच्या वागण्याचा राग आल्याने त्यांनी आपल्या विवाहीत पुतणीला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास संपवलंय.
मयत तरुणीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केलीये. नेहा असं मृत २१ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर संतोष असं २६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पुतणीवर संशय आल्याने काकाच्या रागाचा पारा वाढला. त्याने संताप व्यक्त करत तरुणीच्या दोन्ही पायावर कु-हाडीने वार केले. यामध्ये ती जबर जखमी झाली.
नेहाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पुढील तपास करतायत.