नगरमध्ये सकाळी आई गेली, दुपारी दोघीं बहिणीनाही सोडलं जग, दिवसात जाधव कुंटुब संपल

अहमदनगर : आईसह २ मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे.मन्याळे गावात हि धक्कादायक घटना घडली आहे.सुनिता जाधव(वय ४८),शितल जाधव (वय १८) आणि प्राजक्ता जाधव(वय 22) अशी मृतांची नावे आहेत.घडलेल्या प्रकारामुळे गावात शोकांतिका परसली असुन आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात हि दुर्दैवी घटना घडली आहे.मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली.तर त्यांच्या लेकी शितल जाधव आणि प्राजक्ता जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.आईच्या आत्महत्येनंतर लेकींनी देखील आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.

या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत.पोलीस तपासानंतर या माय-लेकीच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.तिघीना एकाचवेळी जीवन संपवल्याने मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *