नगरमध्ये १७ वर्षाची लेक निघाली अचानक गरोदर, आईने विचारताचं तो घरातलाचं तिचा…

नगर जिल्ह्यात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना संगमनेर तालुक्यात समोर आलेली असून एका २० वर्षीय भावाने त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन सख्ख्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिला दिवस गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहे .संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात ही घटना समोर आलेली असून पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावावर बलात्काराच्या कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलीला लोणी येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन कुटुंबातील एका भावाच्या २० वर्षीय मुलाने नात्याने सख्खी चुलत बहिण असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सात-साडेसात महिन्यांत वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे ..

सतत हा प्रकार घडल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याने लोणी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० वर्षीय तरुणाविरोधात अत्याचाराचे कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *