नग्र असलेल्या बाॅयफ्रेंडच्या पार्श्वभागावर ओतलं उकळतं तेल, तपासात भयंकर कारण समोर

Crime News: महिलेने आपल्याच नग्र असलेल्या प्रियकराच्या पार्श्वभागावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेला अटक (Arrest) केली आहे. तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एरोडे येथे ही घटना घडली आहे. प्रियकर गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ती हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. आपल्याच एका नातेवाईकाशी त्याचे प्रेमसंबंध होते. मीना देवी हिला त्याने लग्नाचं आश्वासन दिलं होतं.

पण जेव्हा मीना देवीला कार्तीचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिने त्याला जाब विचारला. यामुळो दोघांमध्ये अनेकदा भांडण होत होतं. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा कार्ती देवीला भेटण्यासाठी गेला होता तेव्हा कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी मीना देवीने कार्तीच्या पार्श्वभागावर उकळतं तेल फेकून दिलं.

उकळतं तेल भागावर पडल्यानंतर कार्ती खाली कोसळला. त्याच्या पार्श्व भागासोबत हात आणि चेहरा गंभीर भाजला होता. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांनी याप्रकरणी मीना देवीला अटक केली असून तपास सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *