नवरा कामावर गेल्यावर दीर आणि वहिनीचा चालू व्हायचा रोमान्स, एके दिवशी… धक्कादायक घटना समोर!

Crime News : लग्नानंतरही अनेकांचे विवाहबाह्य संबंध असल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. मात्र जेव्हा पती किंवा पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत घरात माहिती होते त्यावेळी अनेक संसार मोडले आहेत. त्यासोबतच अनेक प्रकरणांमध्ये समोर आलं आहे की पती घरात नसताना पत्नीचे बाहेरील किंवा घरातीलच सदस्यासोबत अनैतिक संबंध असतात. मात्र भांडाफोड झाल्यावर जे काही होतं त्यानंतर जीवही गेले आहेत किंवा काहींना वाटेतील अडसर म्हणून आपले प्राणही गमवावे लागल्याची अनेक प्रकरणा पाहिल आहेत. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं असून भावाच्या पत्नीसोत संबंध ठेवणं तरूणाला महागात पडलं आहे.

नेमकं काय घडलं?
हे प्रकरण हरियाणामधील रेवाडीतील धारुहेडामधील आहे. साईनाथ रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमध्ये एक मृतहेत जळालेल्या अवस्थेत सापडतो. रोहित असं मृताचं नाव असल्याचं समोर येतं आणि तिथे तो सिक्युरिटी गार्डचं काम होता. रोहितच्या मृतदेहाची माहिती घरी देण्यात आल्यावर ते सर्वजण येतात. त्यावेळी त्यांना कोणावर संशय किंवा आरोप असं पोलीस विचारतात.

पोलिसांनी विचारताच रोहितचे नातेवाईक थेट त्याच्याच मावसभावाचं नाव घेतात. रोहितच्या खूनामागे करण सिंग याचा हात असून त्यानेच रोहितला संपवलं असल्याचा आरोप ते करतात. पोलीस त्याला बोलावून घेतात आणि कसून चौकशी करतात. त्यावेळी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देतो. मात्र पोलीस जेव्हा थर्ड डिग्री देतात तेव्हा तो आपला गुन्हा कबूल करतो.

डीएसपी बावल राजेश लोहन यांनी माहिती दिली की, रोहित गेल्या एक महिन्यापासून सिक्युरिटी गार्डचं काम करत होता. तिथेच करण सिंह हा सुद्धा कामाला होता. रोहितला एक दिवस करणने त्याच्या बायकोसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. याचा राग त्याच्या मनात होता, एक दिवस तो मद्यधुंद अवस्थेत कॉटवर झोपलेल्या रोहितच्या डोक्यावर एक वीट मारतो.

वीटेचा मार जोरात लागल्याने जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि यामध्येच रोहितचा जाग्यावर मृत्यू होतो. करण इतक्यावर थांबत नाही त्यानंतर तो रोहितच्या अंगावर डिझेल टाकतो आणि त्याला पेटवून देत तिथून निघून जातो. असं सर्व करण याने आपला गुन्हा कबूल करताना सांगितल्याचं राजेश लोहन म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *