नवऱ्याचा फोटो स्टेट्सला ठेवुन बीडमध्ये नर्सनी घरात घेतला गळफास, आधी पतीसह २ महिलांचे फोटो…

बीड : शिरुर कासारमधील एका कंत्राटी नर्सने आपल्या पतीचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसला ठेऊन आत्महत्या केलीये. नवऱ्याबरोबर एक पुरुष आणि २ महिलांचेही फोटो तिने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला लावले होते. शिवकन्या गोरख देवडे (वय ३३) असं नर्सचं नाव आहे. ही महिला बीडच्या पिंपळनेर शिरूर कासारमध्ये राहत होती.

शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून शिवकन्या २०१० पासून काम करत होत्या. शिवकन्या यांचे पती गोरख देवडे ट्रकचालक आहेत तर त्यांना ११ वर्षांचा एक मुलगा आहे. शिवकन्या यांच्या आत्महत्येचं कारण आणखी समोर येऊ शकलेलं नसलं तरी राहत्या घरात एका पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. घराची खिडकी उघडी असल्यामुळे हा सर्व प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात पाठवला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गळफास घेण्याआधी शिवकन्या यांनी व्हॉट्सऍपवर स्टेटसला पतीसह ३ लोकांचे फोटो का ठेवले? याचं उत्तर पोलीस शोधत आहेत.

शिवकन्या यांचे पती गोरख देवडे ट्रकचालक असल्यामुळे ते बाहेरगावी होते तर शिवकन्या यांचा ११ वर्षांचा मुलगा नातेवाईकांकडे गेला होता. त्यामुळे त्या घरी एकट्याच होत्या. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *