नववधूला पळवून नेणारा प्रियकर नव्हे तर ‘ भलताच ‘ निघाला , आतापर्यंत तब्बल..

लग्न लागल्यानंतर अवघ्या काही दिवसात पळून जाणाऱ्या नववधू आपण अनेकदा पाहिलेले असतील. मॅरेज रॅकेटमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असतो मात्र एक अजब प्रकरण सध्या राजस्थान इथे समोर आलेले असून या प्रकरणात सदर नववधू दाखवण्यासाठी तिचा पतीच पुढाकार घेत होता आणि त्यानंतर लग्न लावल्यानंतर ही पळून जायची त्यामध्ये देखील त्याचाच सहभाग असायचा. दोघा पती-पत्नींनी अशा स्वरूपात व्यवसाय सुरू केलेला होता आणि महिलेने आतापर्यंत तीन लग्न केलेली आहेत मात्र चौथ्या लग्नाच्या वेळेस ती पकडली गेलेली आहे. आर्थिक अमिषाच्या उद्देशाने बंटी बबलीने हा व्यवसाय सुरू केलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बनसुर येथील हे प्रकरण असून आसाममधी मूळचे हे दांपत्य आसाम येथील आहे. आपली पत्नी ही अविवाहित आहे असे सांगत हा व्यक्ती तिच्यासोबतचे नाते लपवत विवाह लावून द्यायचा आणि त्यानंतर संधी साधून ही महिला नववधू तिथून पळून जायची.

हरी मोहन मीना ( वय 36 ) असे फसवले गेलेल्या व्यक्तीचे नाव असून मूळच्या आसाममधील मधुनी येथील दीप्तीनाथ नावाच्या एका महिलेसोबत त्याचा विवाह पार पडलेला होता. 3 जून रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पाडला आणि या लग्नात तब्बल आठ लाख रुपये खर्च झालेले होते.

वधूच्या नावाने चार लाख रुपये आसाममधील रहिवासी असलेला बलेता नलबारी नावाच्या व्यक्तीला देण्यात आलेले होते. लग्नानंतर पंधरा दिवसांनीच दीप्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती हे पतीच्या लक्षात आले त्यानंतर त्याने सावध राहण्यास सुरुवात केली.

21 जून रोजी घरासमोर एक कार आली कार चालकाने इशारा केला आणि त्यानंतर दीप्ती घरातून पळाली आणि गाडीत जाऊन बसली. हरी मोहन यांच्या आपल्या मोठ्या भावाला याबद्दल शंका आली म्हणून तो घरातून बाहेर पडला त्यावेळी आरडाओरडा केल्यानंतर कारचालक आणि दीप्ती यांना पकडण्यात आले त्यावेळी कारचालक असलेला व्यक्ती हाच दिप्ती हिचा खरा पती असल्याचा संशय आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी दीप्ती हिने आपले आधीच लग्न झालेले आहे आणि आपल्याला दोन मुले आहेत असे देखील कबूल केले सोबतच कारचालक असलेला बलेता नरबारी हा आपला खरा पती आहे हे देखील पोलिसांना सांगितले. पोलिसांनी बलेता याला विचारले त्यावेळी त्याने हरी मोहन यांच्यावर सर्व प्रकरण लोटून दिले.

हरी मोहन यानेच आपल्या पत्नीला येथे फसवून आणलेले आहे असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी दीप्ती हिच्या पतीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आतापर्यंत तिची तीन लग्न लावून दिलेली आहेत मात्र चौथ्यावेळी आपण पकडले गेलो असे सांगितलेले आहे. पोलिसांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता या आधीदेखील या जोडप्याने असे किती जणांना फसवले आहे याचा तपास सुरू केलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *