नव-याला बाथरूममध्ये अत्यंत वाईट अवस्थेत पकडलं, तो जे करत होता ते बघून आधी हादरले अन् नंतर मलाच लाज वाटू लागली
प्रश्न : मला मान्य आहे अनेकांचे वेगवेगळे खूप छंद असतात. पण छंद वा शौक असे असावेत जे इतरांना देखील मान्य असतील. पण माझ्या बाबतीत एक विचित्र गोष्ट घडली आहे. मला माझ्या पतीच्या अशा एका गोष्टीबद्दल ज्याला शौक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही अशा गोष्टीबद्दल माहिती झाले आहे जे पाहून मला धक्काच बसला आहे. मी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की माझ्या नव-याला या सर्व विक्षिप्त गोष्टींची आवड असेल. एक सामान्य पुरुष म्हणूनच मी आजवर त्याच्याकडे पाहत आले.
पण मी स्वत:च्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी एकदा माझ्या पतीला बाथरूममध्ये गुपचूप माझी अंतर्वस्त्रे घालताना पाहिले. तो अगदी स्वत:ला एखाद्या स्त्री प्रमाणे न्याहाळत होता. ज्या पुरुषासोबत मी एवढी वर्षे संसार केला त्याला या गोष्टी आवडतात असे पाहिल्यावर काही वेळ तर मी स्तब्धच झाले. मला काय करावे कळतच नाहीये. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही) (फोटो सौजन्य :- iStock)
जाणकारांचे उत्तर
सायकोलॉजिस्ट आणि रिलेशनशिप एक्सपर्ट शिवानी साहू यावर उत्तर देताना म्हणतात की, तुम्ही जे सांगितलं आहे ते समजल्यावर कोणालाही धक्काच बसेल. मी तुमची परिस्थिती समजू शकते. पण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी किंवा प्रश्नांची सरबत्ती एखाद्यावर करण्याआधी त्यालाही बोलण्याची आणि त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी असे माझे मत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी तर यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि थेट कोणतेही मत बनवू नये.
स्पष्ट बोला
तुम्ही जे काही पाहिले त्याबद्दल आपल्या पतीशी बोलण्यासाठी अजिबात संकोच बाळगू नका. तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर स्पष्ट बोलावे लागेल. जर तुम्हीच बोलायला संकोच बाळगला तर तुम्हाला सत्य कधी कळणार नाही आणि मनातले विचार कधीच संपणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आपल्या पतीशी यावर थेट आणि स्पष्ट बोलणेच योग्य ठरेल.
(वाचा :- माझं काय चुकलं? ती मला घरात खुश ठेवते अन् मी बाहेर इतर मुलींना..! या पुरूषाने सांगितलेले घाण सत्य ऐकून हादरालच)
भूतकाळ समजून घ्या
तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पती असं मुद्दाम करणार नाही किंवा अशी गोष्ट मुद्दाम लपवून ठेवणार नाही तर मग तुम्ही त्यामागचे नक्की कात्रण काय ते समजून घेतले पाहिजेत्याच्या भूतकाळात अशी एखादी गोष्ट दडली आहे का ते समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे ठरेल. या गोष्टी खूप नाजूक असतात आपण एखाद्या वर सहज राग धरू शकतो पण त्यामागची त्याची भावना काय? त्याचा त्रास काय हे कधी समजून घेत नाही.
जवळच्या व्यक्तीची मदत घ्या
जर तुम्हाला यावर काहीच करावेसे सुचत नसेल तर एखा चांगल्या व्यक्तीची मदत घ्या, जो तुम्हाला आणि तुमच्या पतीला देखील ओळखत असेल. मुख्य म्हणजे अशा व्यक्तीने ही गोष्ट खरे सत्य बाहेर येत नाही तो पर्यंत सिक्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीशी शेअर कराल तो व्यक्ती देखील भरवश्याचा असणे महत्त्वाचे आहे.
नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करा
नातं तोडायचं म्हटलं तर एक मिनिटही पुरेसा असतो आणि जपण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. त्याचे कोणत्याही स्त्रीसोबत अनैतिक संबंध नाहीत ज्यातून तो बाहेर पडू शकत नाही किंवा अशी कोणती गोष्ट नाही जी तुमच्या संसाराला बाधा पोहचवू शकते. त्यामुळे ही समस्या बोलून आणि त्याचं मत जाणून सोडवली जाऊ शकते. त्यासाठी टोकाचा निर्णय घेऊ नका अन् नातं टिकवण्यासाठीच जास्तीत जास्त प्रयत्न करा.