नांदेडमधील प्रेमीयुगुल, समोरांसमोर घर असल्यानी प्रेमात बुडाले…पण नदीकाठी दोघांना ‘तसल्या’ स्थितीत पाहुन गावकरी…,

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह गोदावरी नदी काठावर आढळून आला. मुगट गावातील नदीकाठी प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विकास धोंडिबा तुपेकर (वय २२ वर्ष) आणि ऋतुजा बालाजी गजले (वय १८ वर्ष) असं मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

प्राथामिक माहितीनुसार, या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना (Police) देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रेमीयुगुलाची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, मयत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोन्ही युवक युवती मुगट गावातीलच (Nanded News) रहिवाशी आहेत. दोघांचे घर एकमेकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती. याच विषयावरून अनेकवेळा वाद होऊन विकासला मारहाण देखील करण्यात आली होती.

मात्र, तरी ही दोघांमधील प्रेमसंबंध सुरूच होते. पाच दिवसांपूर्वी हे प्रेमीयुगुल अचानक बेपत्ता झाले होते . कुठे गेले याची कोणालाच माहिती नव्हती. गावात उलट सुलट चर्चा देखील सुरु झाली होती. अखेर २३ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह (Crime News) गावातील गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेनंतर हत्या की आत्महत्या या बाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. हत्या झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *