नांदेडमध्ये नाचता-नाचता तरुणानी सोडले प्राण, व्हिडीओनी एकचं खळबळ

नांदेड : कधी कुणाला काय होईल हे काही सांगता येत नाही.हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण आता तरुणांमध्येही जास्त दिसत आहे.अनेकदा खेळता-खेळता मुलांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.अलिकडच्या काळात ह्रदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

चालता-बोलता मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहे.आता असाचं एका तरुणाचा डीजेच्या तालावर नाचता-नाचता अचानक मृत्यू झाला.या घटनेचा video व्हायरल होत आहे.

DJ च्या तालावर नाचताना मुलाचा मृत्यू
video मध्ये तुम्हाला दिसेल की,एक तरुण डीजेच्या तालावर आनंदानं नाचत आहे.उपस्थितांपैकी एक जण या तरुणाचा नाचतानाचा video चित्रित करत आहे.तरुण गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचत आहे.मात्र अचानक हा तरुण तोंडावर खाली कोसळतो आणि सर्वच जण घाबरतात.डीजेच्या तालावर नाचणाऱ्या या तरुणानी जागीचं प्राण सोडले.

दरम्यान,हि घटना नांदेडमधील आहे.नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातुन या घटनेचा video समोर आला आहे.18 वर्षीय विश्वनाथ जाणगेवाड यानी लग्नाच्या वरातीत नाचताना प्राण सोडले.तर या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *