नांदेडमध्ये प्रेम केलं पण जात वेगळी होती, प्रेमप्रकरणाबद्दल घरच्यांना खबरही नाही अन् प्रेमात अकंठ बुडाल्यावर…

नांदेडः आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे. (Nanded Crime News)आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वेगाडी शुक्रवार दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेगेट जवळ आली. याचवेळी एक तरुण व एक तरुणी प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याने तरुणाचे अक्षरशः धड वेगळे झाले तर तरुणी रेल्वे पटरीच्या बाजूला लांब फेकली गेली.

दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी जमावाची तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. शहराच्या मध्यभागी रेल्वे गेट असल्यामुळे या ठिकाणाहून नागरिकाची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.

दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शिवराम मनोज क्यातमवार, वय २१ रा.भोकर व मुलीचे नाव धारा माधव मोरे, वय १९ रा. रिठा ता.भोकर नांदेड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची जात वेगळी होती. त्याशिवाय त्यांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना काहीच माहिती नव्हती जर घरच्यांना या प्रेमाबद्दल कळाले तर विरोध होईल अशी भीती दोघांनाही होती. या भीतीतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भोकर स्थानकसजवळ नंदीग्राम एक्सप्रेस येताच त्यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

सदरील घटनेची माहिती रेल्वे प्रशासनासनाकडून मुदखेड रेल्वे पोलीसांना देण्यात आली असून माहिती मिळताच रेल्वे पोलीस स्थानकाचे ठाणेदार सुरेश वुनवने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस संदीप पोपलवार, रेल्वे पोलीस दत्ता मुगल, नाईक अनंता आघाव व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालय भोकर येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *