नांदेडमध्ये लग्न झाल्यावरही मेव्हणीचा नाद सोडला नाही, तोडायचं नावचं घ्यायना अन् फुल दारु पाजल्यावर…

नांदेडमधून (Nanded) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मेहुणीसोबत प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिल्याने बहिणीच्या नवऱ्याने (Husband) मित्रांच्या मदतीने तरूणाची हत्या केली. किरण माने असे या मृत तरूणाचे नाव आहे. सोमवारी रात्री 11 वाजता चौपाल परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे.

मृत तरूण किरण माने आणि आरोपी शिवा माने हे शहरातली सराईत गुन्हेगार होते. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. (refused to break up with his sister-in-law wife husband killed boy nanded crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण किरण माने आणि आरोपी शिवा माने हे शहरातली सराईत गुन्हेगार आहेत. यामधील किरण मानेचे शिवा मानेच्या बायकोच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणावरून किरण माने आणि शिवा माने यांच्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे. या वादात शिवा माने किरण मानेला नेहमीच प्रेमसंबंध तोडण्यास सांगून धमकावायचा.

मात्र या धमकीला भीक न घालता शिवा माने प्रेमसंबंध तोडण्यास नकार द्यायचा. त्यामुळे अखेर भावोजी शिवा माने यांनी किरण मानेच्या हत्येचा कट रचला होता.इतवारा पोलिस ठाणे हद्दीतील चौपाल परीसरातील पाण्याच्या टाकीजवळ शिवा मानेने त्याच्या साथीदारासह मिळून किरण मानेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे.

या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. इतवारा पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास करून 4 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.रेकॉर्डवरचा गुन्हेगार असलेल्या किरण मानेचे दुसऱ्या एका क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या शिवा मानेच्या बायकोच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती शिवा मानेला होती. या प्रेमसंबंधावरून दोन्ही सराईत गुन्हेगारांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. मात्र किरण मानेने प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला होता.

याचाच राग मनात धरून शिवा माने साथिदारांसह मिळून किरण मानेची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध 302 चा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती इतवारा पोलिस ठाण्याचे पीआय संतोष तांबे यांनी दिली आहे.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात शिवा माने, अविनाश नंदाने यांसह दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *