नागपुरची विवाहित महिला लंडनच्या स्त्रीरोगतज्ञाचं तसलं ‘ गिफ्ट पाहण्यासाठी आसुसलेली, काकी इतकी वेडी झाली कि…
महाराष्ट्रात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून त्यामध्ये परदेशातून तुम्हाला गिफ्ट पाठवले आहे अशा स्वरूपाच्या अनेक फसवणुकीच्या घटना रोज उघडकीस येत आहेत मात्र तरी देखील नागरिकांना फ्री गिफ्टचे आमिष दाखवत अशाच पद्धतीने लूटले जात आहे . नागपूर शहरात अशीच एक घटना समोर आलेली असून एका महिलेला इंस्टाग्रामवरून संपर्क केल्यानंतर तिच्यासोबत ओळख वाढवण्यात आली आणि तिच्यासोबतही असाच फसवणुकीचा प्रकार करण्यात आला.
अंबाझरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर महिलेचे इंस्टाग्रामवर खाते असून ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करते त्यावेळी तिला ऑलिव्हर विल्यम नावाच्या एका व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती आणि त्यानंतर त्यांनी एकमेकासोबत बोलणे सुरू केले. आपण लंडन येथे स्त्रीरोगतज्ञ आहोत असा बहाना बनवत त्याने महिलेचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यानंतर तिच्यासोबत तो व्हाट्सअपवर देखील संपर्कात होता.
काही दिवस उलटल्यानंतर त्याने महिलेला आपण तुझ्यासाठी एक मोफत गिफ्ट लंडन इथून पाठवत आहोत असे सांगितले त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट आणि आयफोन आहे असे म्हटल्यानंतर सदर गिफ्ट संपूर्णपणे मोफत आहे हे लक्षात आल्याने महिलेने त्याला होकार दिला. माझा माणूस तुला लवकरच फोन करेल असे देखील तो म्हणाला आणि पाच मे रोजी महिलेला जॉन नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला तुमचे पार्सल विमानतळावर पोहोचलेले आहे. कस्टम क्लीअरसाठी 25000 रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले.
ऑलिव्हरने पाठवलेले गिफ्ट पाहण्यासाठी महिला आतुर झालेली होती त्यामुळे तिने तात्काळ विश्वास ठेवून 25 हजार रुपये भरून टाकले. काही वेळाने त्यांना परत फोन केला त्यावेळी त्यांनी रक्कम कमी पडत आहे आणखीन 90 हजार रुपये भरावे लागतील. ते भरले नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असे सांगितले त्यानंतर महिलेने 90 हजार रुपये देखील भरून टाकले मात्र पुन्हा फोन करून दीड लाख रुपये मागण्यात आले त्यावेळी मात्र महिलेला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.