नागपुरात आठवीतील लाडक्या लेकीला चौथा महिना, सोनोग्राफी होताच आईचं डाॅक्टरांदेखत विचीत्र कृत्य
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून नागपूर येथील ही घटना आहे. इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाचा आठवीत शिकणाऱ्या त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीवर जीव जाडला आणि कोवळ्या वयात त्यांच्यातील प्रेम फुलू लागले. धक्कादायक बाब म्हणजे आता ही आठवीतील मुलगी तब्बल चार महिन्यांची गर्भवती असून पोट दुखू लागल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे. सातवीतील अल्पवयीन मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पंधरा वर्षांची मुलगी मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या आई-वडिलांसोबत राहते. शाळेत जाण्यापूर्वी ती तिच्या वर्ग मैत्रिणीच्या घरी जात होती आणि ती मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघी शाळेत जात असायच्या. तिच्या मैत्रिणीचा भाऊ हा सातवीत शिकतो याच दरम्यान तिची आणि त्याची ओळख झाली आणि बहिण घरी नसताना देखील वेगवेगळ्या बहाण्याने ते भेटू लागले.
25 जानेवारी रोजी ही मुलगी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घरी गेलेली होती मात्र मैत्रीण आई-वडिलांसोबत शेतावर गेलेली होती तर तिचा भाऊ घरी एकटाच होता त्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर हा प्रकार नेहमीचाच होऊ लागला. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखायला लागले म्हणून खाजगी रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या मुलीच्या आईने डॉक्टरांच्या समोरच तिच्या कानाखाली वाजवली त्यावेळी तिने या अल्पवयीन मुलाची माहिती दिली.
मुलीच्या नातेवाईकांनी या अल्पवयीन प्रियकराला मुलीच्या घरी बोलावले त्यावेळी त्याने तिचे माझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत असे देखील सांगितले. दोन्ही दोघेही अल्पवयीन असल्याकारणाने मौदा पोलीस ठाण्यात प्रकरण गेले त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे.