नागपुरात व्यावसायिक वडिलांची ५ लाखाची सुपारी, मुलगीच निघाली मारेकरी; म्हणाली, पप्पा आईला सोडुन भाड्याच्या खोलीत…
नागपूर- पेट्रोलपंप व्यावसायिक दिलीप सोनटक्के यांच्या निर्घुण खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना पाच दिवसानंतर यश मिळाले आहे. सोनटक्के यांच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीला पोलिसांनी अटक केली. प्रिया किशोर माहुरतळे (३२, रा. सर्वश्री नगर, दिघोरी नागपूर), असे संशयित आरोपी मुलीचे नाव आहे.
स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मृत दिलीप सोनटक्के (वय ६०) यांचे असलेले विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने मुलीने संगनमत करून त्यांना संपविल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे कळतेय. मृत दिलीप सोनटक्के यांचे दोन वर्षांपूर्वी उमरेड येथील एका महिलेशी दिलीप यांचे सूत जुळले. तिच्यासोबत काही दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतर वर्षभरापूर्वी दिलीप यांनी जिंदल कॉम्पलेक्समध्ये फ्लॅट खरेदी केला. तेव्हापासून ते महिलेसोबत या फ्लॅटमध्ये पती-पत्नी प्रमाणे राहायला लागले होते…
सोनटक्के यांनी पहिल्या पत्नीच्या घर खर्चातही हात आखडता घेतला होता. ही बाब दिलीप यांची पत्नी व मुलींना माहीत होती. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. यातून मुलीच्या मनात वडिलांबाबतचा संताप वाढत गेला. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होते. कौटुंबिक प्रॉपर्टीसुद्धा हातातून जाईल. याच भीतीने मुलीने चक्क वडिलांची सुपारी देत गुंडांच्या मदतीने त्यांचा खून करत काटा कायमचा काढण्याचे ठरवले. त्यानुसार तिने ५ लाखाची सुपारीची देवाण घेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भिवापूर येथील राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोलपंपावर बुधवारी (दि. १७) सकाळी १० वाजताच्या सुमारास मालक दिलीप सोनटक्के (६०, रा. नागपूर) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने तब्बल १९ वार केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान वल्द शेख हनिफ (३३, रा. मोठा ताजबाग, नागपूर) व मोहम्मद वसीम उर्फ सोनू वल्द लाल मोहम्मद (२८, रा. खरबी, नागपूर) या दोघांना उमरेड परिसरातून तर शेख जुबेर शेख कय्यूम (२५, रा. मलीक शाळेजवळ, अख्तर ले-आउट, मोठा ताजबाग, नागपूर) याला नागपूर येथून अटक केली होती.
परंतू पोलिसांना घटनेच्या दिवशीपासूनच हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांचा संशय खरा ठरला असून पोटची मुलगीच बापाची मारेकरी ने निघाली. हत्या करणारे व हत्या करवून घेणारा यांना पोलिसांनी अटक केली असली तरी या दोघांच्या मध्ये आणखी तिसरा असणारा व्यक्तीच्या शोधात पोलीस आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींची वाढ होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.