नाल्यातुन वाहुन गेलेली महाराष्ट्राची दिक्षा थेट युपीत सापडली ‘अशा’ अवस्थेत, पोलिसही चकित
मुंबई: नालासोपारा (Nalasopara) धानिवबाग परिसरात राहणारी एक १५ वर्षीय मुलगी सहा दिवसांपुर्वी नाल्यात वाहून गेली होती. बेपत्ता झालेली ती मुलगी आता थेट उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आढळून आली आहे.
दिक्षा यादव असं या वाहून गेलेल्या मुलीचं नाव आहे. १६ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे धानिवबागच्या सिद्धिविनायक चाळीत राहणारी दीक्षा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसात घराबाहेर शौचालयास गेली असता, याच वेळी उघड्या नाल्याजवळ तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याचं सांगण्यात आलं होतं.
या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दिक्षाला शोधण्याचं काम सुरू केलं होतं. अनेक प्रयत्न करून, अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन करून देखील दिक्षा हिचा काही थांगपत्ता लागला नव्हता.
मात्र, जवळपास सहा दिवसानंतर आज दिक्षाचा फोन तिच्या आईला आला, ती नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेशमधील गाजीपुर येथे तिच्या मामाकडे आहे आणि सुखरूप असल्येचं तिने फोनवर सांगितलं आहे. पोलिस यंत्रणा दिक्षाला जवळपास ६ दिवसांपासून शोधत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिक्षा ही नाल्यात वाहून गेली नसून उत्तर प्रदेश येथे पळून गेली असल्यांच सांगण्यात येत आहे.आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणानंतर ति रुसुन मामाकडे गेली असल्याचं समोर आलं आहे.