|

नाशिकमध्ये आधी पत्नीवर शस्त्राने वार करत संपल, नंतर स्वत: केली आत्महत्या;हैराण करणार कारण उघडं

नाशिक : चारित्र्यावरील संशयातुन पतीने बायकोची हत्या करत स्वतःही जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नाशिकमधील अंबड भागात घडली आहे.भुजंग अश्रू तायडे आणि मनिषा भुजंग तायडे अशी पती-पत्नीची नावे आहेत.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी हजर होतं घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला.

दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवले.पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असुन,या प्रकरणी अंबड पोलीस खोलवर तपास करीत आहेत.

आधी पत्नीला संपवले मग स्वतः केली आत्महत्या
नाशिकच्या अंबड चुंचाळे परिसरात तायडे पती-पत्नी कुटुंबासोबत राहत होते.पती भुजंग याला आपली पत्नी मनिषाचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.याच संशयातुन त्याने बुधवारी सायंकाळी धारदार शस्त्राने वार करत मनिषाची हत्या केली.पत्नीची हत्या केल्यानंतर भुजंगने स्वतःहि किचनमधील पंख्याला गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

मुले क्लासवरुन घरी आल्यानंतर घटना उघडकीस
सायंकाळी ७ दरम्यान मुले क्लासवरुन आल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी दार ठोठावले,आईला हाकही मारली.मात्र बराच वेळ दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले.शेजाऱ्यांनी दरवाजा उघडुन आत पाहिले असता आत दोघेही पती-पत्नी मृतावस्थेत दिसले.यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पती-पत्नीमध्ये वाद
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले.भुजंग कुटुंब मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील असुन,कामानिमित्त नाशिक येथे राहत होते.भुजंग हा पिठाच्या गिरणीत काम करत होता.भुजंगला मनिषाच्या चारित्र्यावर संशय असल्याने अनेक दिवसांपासुन त्यांच्यात वाद सुरु होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *