नियतीचा निर्दयीपणा! ज्याला ५ वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं त्याचा शेवट चेहरासुध्दा आई-वडिलांना पाहता आला नाही

अमरावती: 5 वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं,ज्याचे सगळे लाड पुरवले,ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही करण्याची तयारी असलेल्या वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या लेकाला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत.हि हृदय पिळवटणारी घटना बघुन गुरुवारी अनेकांचे डोळ्यात अश्रुंचा धारा होत्या.

एकाएकी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने होत्याचे नव्हते केले.गुरुवारी डवरगाव येथील अपघातात अन्वित एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला.तर आई-वडील दोघेही जखमी अवस्थेत हाॅस्पिटलमध्ये होते.अंत्यसंस्कार करणं गरजेचं होतं.मात्र,द्विधा अवस्थेत असलेल्या कुंटुबातील सदस्यांनी तसेच मित्रमंडळींनी आई-वडिलांच्या पश्चात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.अंतोरा येथे त्याच्या मुळ गावी जड अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे पत्नी कवितासह मुलगा अन्वित यांच्यासोबत आपल्या दुचाकीने अमरावतीला येत होते.तेवढ्यात मागुन भरधाव येणाऱ्या वरुड अमरावती एसटीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यामध्ये समोर बसलेला अन्वित हा थेट बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर पंकज आणि कविता दोघेही या अपघातात गंभीर जखमी झालेत.

अन्वितचे वडील पंकज यांचा या अपघातात एक पाय निकामी झाला.तर कविता यासुद्धा या घटनेत मोठा धक्का बसला आहे.दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकाएकी हसत्या-खेळत्या कुटुंबाला नजर लागावी असाच हा भयंकर प्रसंग आहे.घटनेनंतर माहुली जहागीर पोलिसांनी एसटी बस चालक दामोदर काशीरावजी नांदूरकर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *