MPSC परीक्षेत सहावी अन् दर्शनाची रायगडच्या पायथ्याशीचं सापडली सडलेली बाॅडी; वडिलांनी सगळ सांगितलं

पुणे: किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

दर्शना दत्तू पवार, असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून तिने नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची आणखी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र, आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र, १२ जून रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र, तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे चौकशी साठी आलो तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेल्हे तालुक्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. खुनाच्या घटनांमुळे वेल्हे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *