‘नेहमी मुलाचीचं चुक असते असं नाही, ६ महिने माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले….’मन व्याकुळ करणारं पत्र, बी.फार्मच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कौशांबी – उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका बी फार्माच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या मुलाचा मृतदेह घरच्या खोलीत पंख्याला लटकताना आढळला. मुलाने मरण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. आयुष्य संपवण्यापूर्वी युवकाने एका फेसबुक पोस्टमधून त्याच्या प्रेयसीला मृत्यूसाठी जबाबदार धरले.

युवकाच्या मृत्यूची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला.ही घटना कैमा गावातील आहे. जिथं छोटेलाल यादव जे शेतकरी आहेत. त्यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. मोठा मुलगा दिल्लीत खासगी नोकरी करतो तर मुलीचे १ वर्षापूर्वी लग्न झाले. सर्वात छोटा मुलगा राहुल यादव सिराथू कॉलेजमध्ये बी फार्मचे शिक्षण घेत होता.

फार्माच्या फायनल परीक्षेची तो तयारी करत होता. कुटुंबाच्या माहितीनुसार, राहुल कोविड काळात सार्वजनिक आरोग्य केंद्रात नोकरी करत होता. त्यावेळी तिथे काम करणाऱ्या महिलेसोबत राहुलचे प्रेम जडले. या दोघांमध्ये जवळपास ३ वर्ष संबंध होते.

शनिवारी सकाळी अचानक राहुल यादवचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी युवकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळली. मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. राहुलने मृत्यूच्या ८ तासपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्याने त्याच्या मृत्यूसाठी प्रेयसीला जबाबदार धरले होते.

सुसाईड नोटमध्ये प्रेयसीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं होते की, माझे आयुष्य हिने खराब केले. माझ्याशी लग्न करण्याचे वचन देत ६ महिने संबंध ठेवले आणि आता म्हणते, तू मर, माझे तुझ्याशी देणेघेणं नाही. माझा अनेक महिन्यांपासून मानसिक छळ सुरू आहे. पूर्वी रात्रभर बोलायची आणि इतका छळ करते की ते मला सहन होत नाही. माझे आयुष्य बर्बाद केले. त्यासाठी हीच जबाबदार आहे. नेहमी मुलाची चूक नसते असं त्याने लिहिलं. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *